बुधवार, ३ नोव्हेंबर, २०१०

Agile Life Management - Generation Gap

Prerequisite -Agile(SCRUM) ची तोंड ओळख आणि SDLC चे न्यान.

Project Management चे हे दोन प्रकार आहेत - SDLC आणि Agile (त्यातले specific SCRUM) ह्या बद्दल जास्त माहिती इथे वाचा -


मूळ मुद्दा ह्यांच्यावर बोलणे नाही परंतू काही महिन्यांपूर्वी मी Certified SCRUM Master झालो तेव्हा माझी ओळख SCRUM शी झाली. आणि त्या दिवशीपासून मला SDLC आणि SCRUM हे केवळ प्रोजेक्ट करता वापरल्या जाणाऱ्या प्रणाली नसून आपल्या आयुष्याशी बरेच साम्य वाटले.

माझ्या आई वडिलांच्या generation ने आयुष्यभर SDLC वर प्रेम केले. साचेबद्ध आयुष्य जगले प्रत्येक गोष्टीचे आधी Requirement Analysis केले, Design केले, Execution केले. आयुष्यातल्या प्रत्येक लहान आणि मोठ्या आनंदाचे, celebration चे, सणांचे, कार्याचे, मुलांच्या शिक्षणाचे, त्यांच्या लग्नाचे planning केले, budgeting केले. आजही माझ्या वडिलांना त्यांच्या १० वर्षापूर्वीच्या पगाराचे break-up माहिती आहे, basic किती ? hra किती ? etc. मला माझ्या आजच्या पगाराचा फ़क़्त in hand माहिती आहे. साहजिक आहे... वडिलांच्या पगाराच्या प्रत्येक रुपयावर देणेकर्याचे किवा इंदिरा विकासचे नाव लिहिले होते. मला अजून आठवते, माझी आजीचा अगदी ४ वर्षापूर्वीपर्यंत (म्हणजे जिवंत असे पर्यंत) महिन्याचा औषध कोटा ठरलेला असायचा pension मधला.

आणि आज माझी अवस्था अशी आहे कि रोजचा दिवस ढकलायचा ... रोजचे हिशेब जुळवायचे ... रात्री online balance चेक करायचा आणि उद्याचे उद्या बघू असे म्हणून झोपायचे. काही वर्षांपूर्वीपर्यंत (३-४ वर्षांपूर्वी) हे असे विकली चालायचे, म्हणजे week-end to week-end असा हिशेब असायचा. मग पगार वाढले, खर्च वाढले (खरं तर वाढवले), गरजा वाढल्या म्हणजे unexpected गरजा वाढल्या, planned गरजा त्यांच्या जागी होत्याच (home loan , LIC etc.). पण हळू हळू week चे दिवसांवर आलो. आणि हे फ़क़्त आर्थिक दृष्ट्या नाही तर सगळ्याच बाबतीत. अहो मला आठवते माझ्या आई बाबांचे भांडण झाले कि कधी कधी आठवडाभर अबोला असायचा. आजकालच्या पती पत्नीचे काय ... सगळे मिटवायचे झोपायच्या आत.. त्या च्या त्या दिवशी ... कारण शांत झोप आवश्यक आहे, दुसऱ्या दिवशीच्या लढाई साठी. उगाच झुरत झुरत रात्री काढायला वेळ नाही कि energy नाही. (आवश्यक नाही पण डोम्बिवली Fast चा ओपेनिंग सीन आठवून पहा, रोज तेच तेच दळायचे... म्हणजे जगायचे. आजकालच्या पिढीच अगदी असे झाले आहे आणि इतक्या पराकोटीला पोचले आहे कि आता त्यांच्या आयुष्यात surprises सुद्धा तीच असतात expected and predictable)

अजून काही प्रातिनिधिक उदाहरणे इथे लिहितो -

१. दिवाळी सोने खरेदी करण्यासाठी २ वर्ष आधीपासून दर मुहूर्ताला १ ग्राम सोने घेणे. गाडगीळ किवा नगरकरांकडे सुवर्ण संचय भिशी हि प्रत्येक गृहिणी ची ठरलेली Savings ची method होती. आज बरेच जण प्रयत्न करतात सुवर्ण संचय करायचा. दुसऱ्याच महिन्यात उरलेल्या सगळ्या महिन्यांचे PDC दिले जातात किवा काही extream केसेस मध्ये पैसे देखील तसेच मध्ये सोडून दिले जातात, कोण हजार दोन हजारचे हिशोब ठेवतो?

२. दिवाळी ची तयारी अगदी १५ दिवस आधीपासून आमच्या घरी असायची पूर्वी. घरी कंदील करणे, फराळ करणे, किल्ला करणे, फटक्याचे quotations आणणे (कुठे सगळ्यात स्वस्त आहेत वगैरे...) असे बरेच उद्योग आई वडील मागे लावून द्यायचे. आता दर वर्षी नवा कंदील तो पण ready made, फटके जवळच्या दुकानातून (कितीही महाग मिळाले तरी), plastic चा किल्ला (ह्या वर्षी मी ४०० रुपयांची प्रतापगड ची प्रतीकुती पहिली plastic ची) अहो कारण सुट्टी दोनच दिवस आहे. त्यातला एक दिवस jet lag मध्ये जातो. जसा आमचा प्रत्येक week-end जातो ना तसा.

३. माझ्या आईने सगळ्या आप्तेष्टांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, इतर महत्वाचे दिवस एका वहीत टिपून ठेवले आहेत आणि आता इतके वर्ष ती वहि refer केल्याने बरेचसे पाठ झाले आहेत, अजूनही मला आईकडून reminders येतात (तोंडी) कि अरे उद्या अमुक अमुक चा वाढदिवस आहे. मला सोडा पण माझी आई कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल तर त्यातील नवऱ्याला हळूच आदल्या दिवशी फोन करून आठवण करून देते... उद्या लग्नाचा (कितवा वगैरे) वाढदिवस आहे. Height of planning. आम्हाला facebook, orkut, skype असल्या महाभागांनी आठवण करून दिली आणि अगदी वेळ, मूड सगळे जुळून आले आणि तिथेच reply/wish असे button असेल तर आम्ही करतो बुवा विष. कारण माहिती असते समोरच्यालाही इतके काही पडलेले नसते आपल्या शुभेच्छांचे.

अशी मी अनेक उदाहरणे जगतो आहे ... ती generation gap कि काय म्हणतात ना ते म्हणजे खरं फ़क़्त
Change in Life Management Methodology आहे.

आम्ही ह्या युगातील Certified SCRUM Master आहोत. काही लोक Daily Sprint मध्ये आहेत तर काही Weekly.

Just out of curiosity - तुमच्या आयुष्याची Sprint Cycle काय ?

४ टिप्पण्या:

Shashibhushan Gokhale म्हणाले...

Very apt description of today's person living in city and mostly in software field.

Aaj saNa he anandache kshaNa vaTaNya aivaji overheads vatu lagale aahet.

Aani hyach barobar ayushyatil anapekshit anandache kshaNa sampale aslyane kashane anand hoil he hi kaLat nahi aahe.

tya muLe ayushyabaddal nirasha vataTe!

hyache ek karaNa ase vaTate kee negativities la aplya aayushyat sthan tasech aahe, pan apale poisitive goshteen shi association kamee zale aahe. tyache resultant asate nirasha.

kahi marga sapaDlyas krupaya kaLavaNe.

Abhijeet Sawant म्हणाले...

आम्ही ह्या युगातील Certified SCRUM Master आहोत. काही लोक Daily Sprint मध्ये आहेत तर काही Weekly.



भारी लिहिले आहेस ...

Harish म्हणाले...

छानच लिहिले आहेस!

म्हणूनच कधी कधी वाटते, नव्हे नेहेमीच वाटते; आपण बरे आपले "KANBAAN" बरे. पण त्याचेही गुण-दोष आहेतच. एकुणात काय, पूर्वी इतकी "long term visbility " आता नाहीये म्हणूनच SDLC सोडून लोक SCRUM किंवा KANBAN बद्दल boltat किंवा तसे शोध लागतात. असाच कोणीसा अंतर्मुख माणूस अश्या भानगडीत पडतो आणि असे blogs भरतो ;). कारण तेच , हे असे विषय आताशा मोकळेपणाने मांडणे हा एक मोठा विषय आहे. संभाषणाचा अभाव. तिथे "product owner ", "product manager " असे काहीसे तर्हेवाईक आपले नातेवाईक बनतात आणि इथे नातेवाईक तर्हेवैकपणे वागतात. असो!

सगळे जण प्रत्येक पिढीत तीच-ती वाट चोखाळतात. कोणीही लेकाचा "Reverse Engineering" करून तपासून पाहत नाही. आपल्याच आयुष्याकडून इच्छा अपेक्षांचे डोंगर रचायचे, आणि ते भागवण्यासाठी धावपळ करायची. आयुष्य जगायला वेळच मिळत नाही मग, आणि वाटते, अरे आपल्या आई-बापाने मर मर मरेस्तोवर कामे केली, जगवले, शिकवले कशासाठी? हे असे डुकरा-मांजराचे आयुष्य जगण्यासाठी? सगळ्या धकाधकीत इति-कर्तव्यता काय हेच विसरलोय अन मग अशा "Quality Models " चा उपमर्द करतो आपण.

माझी आई म्हणायची, मी लहान असतांना ती सांगायची, बाप्पाकडे काय मागायचे? "देवा, आधी सगळ्यांचे भले कर आणि मग माझे कर!" आजच्या स्पर्धेच्या युगात हिम्मत होईल का कोणाची आपल्या लेकरांना असे सांगायची? आला क्षण आपला, तो पूर्ण आपलासा कसा करता येईल ह्याचा विहार कोणीच करत नाही. अखिल भारतवर्षाचे ओझे माझ्या एकट्याच्याच बोडक्यावर दिल्याच्या अविर्भावात आपण जगतो, आणि छोटे छोटे चिमुकले आनंदाचे कण सोडून मोठ्या धोंड्यांच्या मागे पळतो. मजा मजा आहे सगळी.

एकूण काय, आपले RELEASE कधी EOL होणार हे माहित नसतेच. स्प्रिंट वर स्प्रिंट आपटत राहायचे, velocity match होतील इतक्याच stories घेण्याचा प्रयत्न करायचा तेही "relative estimation " नि, सगळेच काही एका स्प्रिंट मध्ये शक्य नाहीये हे अंतर्यामी जाणून असतो आपण, पण तरीही खटाटोप करायचा आणि "आम्ही अगिले, आम्ही AGILE अशा होळीच्या दिवशी मारतात तशा बोंबा मारत दिवस ढकलायचे. :)

Rohit म्हणाले...

अप्रतिम लिहिले आहेस...