आज सकाळी नेहमीप्रमाणे घाई घाई ने आवरले आणि निघालो तेव्हा बायकोने विचारले ...
तुला कसली रे एवढी घाई ?
आयुष्याची पाने मला उलटायची घाई
हसायची घाई, मला रडायची घाई ...
चार पावले चालताच मला पडायची घाई
खायची घाई, मला पिण्याची घाई ...
कोणी काही देवो, मला घेण्याची घाई
जिंकायची घाई, मला हरायची घाई ...
कुठे जातो माहित नाही, पण धावायची घाई
भेटीची घाई, मला गाठीची घाई ...
ऐन तारुण्यातच मला साठीची घाई
सवयीची घाई, मला सवयीची घाई ...
मरणाची घाई ... मला सरणाची घाई ... मला सरणाची घाई ...
३ टिप्पण्या:
अप्रतीम
भेटीची घाई, मला गाठीची घाई ...
ऐन तारुण्यातच मला साठीची
फार आवडली..
पण..
अती घाई जीव वाया जाई.. :)
झकास लिहीले आहे...
टिप्पणी पोस्ट करा