आस्तिकतेची भीती बाळगून ओढून ताणून नास्तिक मी
खरे तर तुला भेटण्या अत्यंत आतुर अन अगतिक मी ...
समाजातले स्थान टिकविण्या चढतो तुझी पायरी
चुकवीत डोळा मग तुझ्यावरच करतो मनसोक्त शायरी ...
तुझ्या पुढ्यात मनातली हुरहूर अन चिंता वाढत जात
नकळतच मग, शरीर जोडते हात अन मन सोडते हात ...
पितोही मग ओंजळीतून मी तुझ्या चरणीचे तीर्थ
दाटून येतो घशाशी तेव्हा अवघा जगण्याचा अर्थ ...
भक्तांच्या गर्दीमधल्या नास्तिकतेच्या ढोंगाचे प्रतिक मी
खरे तर तुला भेटण्या अत्यंत आतुर अन अगतिक मी ...
४ टिप्पण्या:
आस्तिकतेची भीती बाळगून ओढून ताणून नास्तिक मी
खरे तर तुला भेटण्या अत्यंत आतुर अन अगतिक मी ...
आवडली
सोयीनुसार आस्तिक किंवा नास्तिक असतो आपण.. आपली आस्तिकता म्हणजे आपली insecurity , भीती, आणि नास्तिकता म्हणजे या भीती वर चढवलेला brave मुखवटा असतो.
1 number as always !
शरीर जोडते हात अन मन सोडते हात ... खास!
छान लिहिले आहे,
माझ्या अनुदिनीचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/
Vishwesh chaan lihitos khoop re. Pan mala ek goshta khatakli ti mhanje ayushyachya tishitach tula tyacha artha umgayla lagla tar sathit kay hoil tuzhya manache ?
टिप्पणी पोस्ट करा