सांग सखे कसा आवरू मी बुडण्याचा मोह
खुणावत आहेत मजला तुझ्या नयनीचे डोह नको लवून पहाटे अशी वेचू ... सखे... फुले
मन उगाच बांधती मग... तुझ्या झाडी ... माझे झुले
केली सगळी तयारी मनी एकच हा ध्यास
कधी करायचा सांग... सात पावलांचा प्रवास
सांग कधी पडतील हव्याहव्याश्या त्या गाठी ...
अन माझ्या नावाभोवती तुझ्या नावाची ग मिठी
आता नको नाही म्हणू, आता नको मागे फिरू, आलो तुला मी शरण
माझ्याशिवाय तुझ्या जगण्यात, आपसूक माझे मरण ... माझे मरण
४ टिप्पण्या:
chhan
Atti uttam..
मस्त!
farch surekh aahe hi :)
टिप्पणी पोस्ट करा