अजून किती राती काढू सखे अश्या झुरत .... झुरत ?
घे तुझे हे साठवलेले सगळे क्षण साभार .... परत
आता नाही उरले त्राण ... आठवणीत रमायला
आता नाही उरले प्राण ... ओवाळून टाकायला
उरले फ़क़्त वास्तव भेसूर, अन उरला रितेपणा
सरल्या सगळ्या इच्छा, अन सरला जीतेपणा
नका तीर्थ ओतू .. नका ठेऊ तुळस, वेळ आली जाण्याची
अशीच निरंतर राहूदे चव, तिच्या हातच्या पाण्याची
३ टिप्पण्या:
मस्त आहे कविता ...
मला बोरकरांच्या "संधीप्रकाशात" साधर्म्य असल्यासारखी वाटली
Utkat prem bhavana .. :) very nice
aart..
टिप्पणी पोस्ट करा