सोडली जुनी वहाणे .... चाललो पंढरीचे ठायी ....
चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी ....
आला न्यानियाचा गाव .... जमले सारे रंक नि राव ....
हरिनामाच्या घोषात ... उभा आसमंत न्हाही
चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी ....
रूप पाहता लोचनी .... तृप्त जाहलो ध्यानीमनी ....
पाहून सावळा मनोहर .... भान हरपून जाई ....
चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी ....
विसरुनी रोजचा रहाट .... झाली नवीन पहाट
झालो कधी मोकळा .... माझे मलाच कळले नाही ...
चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा