मंगळवार, २९ मार्च, २०११

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

स्वतापुरते लढायचे बळ तेवढे आता गाठीशी आहे ...
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."

तुझ्या ह्या आश्वासनाने केले होते भितीना दफन ...
अन उभा ठाकलो लढाया जगाशी बांधून डोईवर कफन
माहित नव्हते माझी लढाई नशिबाच्या काठीशी आहे ....
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."

लढलो अनेक समरे काही जिंकलो काही हरलो
लढता लढता लोटली वर्षे, परंतु मागे नाही फिरलो ...
हरलो शेवटी वयाकडून, माहित नव्हते गाठ साठीशी आहे ...
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."

गळाले सगळे बळ, अन गळाल्या सगळ्या आशा
आलास समोरून चालत अन दिलास पुन्हा दिलासा ...
दाखवलास मज आरसा माझ्याच भूतकाळाचा
दिसला त्यात चेहरा मज एक निरागस बाळाचा ...

दाखवून मलाच माझे बिंब म्हणालास
"कोण तू होतास  ... अन काय तू झालास"
उभ्या जीवनाचा अनुभव तुझ्या गाठीशी आहे ....
अन म्हणालास "भिऊ नकोस .... तू माझ्या पाठीशी आहे"

३ टिप्पण्या:

Ravi म्हणाले...

माहित नव्हते माझी लढाई नशिबाच्या काठीशी आहे ....

nice!

Shirish Jambhorkar म्हणाले...

खूप छान :) ...

पैसे पैसे काय करतोस .. समाधान मानायला शिक ...
उपाशी मेलास तरी चालेल ... पण मागू नकोस भीक ....
म्हैस तरी हवी होती .. माहीत नव्हते गाठ लाठीशी आहे ...
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."

Shirish Jambhorkar म्हणाले...

वरच्या ४ ओळी सहज सुचल्या .. Thanks for inspiration :) it was good to read something like this quality