मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

अजून एक रात्र

त्या रात्री स्वप्नाच्या राज्यातली एक नदी तिच्या डोळ्यात उतरली होती ...
त्या रात्री वेगळेपणाची सगळी जाणीव पूर्णपणे सरली होती ...

उरले नव्हते कुठलेही पाश, न उरली कुठलीही आस ...
वाटले मिटून घ्यावे डोळे .... तू असता अशी पास

भरून घ्यावा तुझा गंध, जपून ठेवावा तुझा स्पर्श
असाच होत राहावा दोन मनाचा अन दोन देहाचा परामर्ष

अचानक भंगले स्वप्न, उरली ती फ़क़्त रिकामी उशी ...
तुझ्याही शेजारी असेल का ग ती ...... तशी ?

नकळत गालांवर पाण्याची रेष उमटली ...
असेल का ग तुझीही उशी अशीच ओली ?

विषय बदलावा म्हणून कूस बदलली
विषय बदलावा म्हणून कूस बदलली
अन अजून एक रात्र तशीच .... सरली ........

३ टिप्पण्या:

Harish म्हणाले...

खलास, तू म्हणजे करुण रसाचा पाऊस पडलास. विरहिणी...चांगली जमलीये :) झकास!

BinaryBandya™ म्हणाले...

bharee re ...

Prajakta म्हणाले...

Kyaa Baat hai!!