प्राजक्ता पटवर्धन यांच्या "मनात माझ्या ... " ह्या गाण्यावरून प्रेरणा मिळाली आहे ....
अजूनही होतो सखे मजला भास तुझा ...
अजूनही दरवळतो माझ्या रात्री रात्रीत .... सुवास तुझा
अजूनही होतो सखे मजला भास तुझा ...
अजूनही प्रेमवेड्या मनाला लागला .... ध्यास तुझा
अजूनही होतो सखे मजला भास तुझा ...
अजूनही भूक भागवतो तो कधीचा भरविला .... घास तुझा
अजूनही होतो सखे मजला भास तुझा ...
अजूनही मलाच दीर्घायू करतो आहे .... श्वास तुझा
अजूनही होतो सखे मजला भास तुझा ...
अजूनही चिंब भिजवतो मज आठवणींचा .... न्यास तुझा
अजूनही होतो सखे मजला भास तुझा ...
उमगत नाही हा कुठला न संपणारा .... प्रवास तुझा ....
खरं सांगू सखे तू नसताना अजूनही होतो .... भास तुझा .... अजूनही होतो .... त्रास तुझा ....
1 टिप्पणी:
शेवट आवडला ..
अजूनही होतो .... भास तुझा ....
अजूनही होतो .... त्रास तुझा ....
टिप्पणी पोस्ट करा