मंगळवार, १९ जुलै, २०११

वरचा "सा" - आमची लग्नाष्टमी !

आज आमच्या लग्नाचा आठवा वाढदिवस ..... 
आज आमच्या संसाराच्या सुरावटीने वरचा "सा" गाठला ... 

पहाटे पहाटे उगाच मला पल्लवी जोशी चा भास झाला ... आणि ती कर्ण कर्कश्श आवाजात ओरडली "एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, वरचा "सा", वाः क्या बात  है !".  मी आपले सगळे स्पर्धक करतात तसे खोटे खोटे "हि हि हि, धन्यवाद" वगैरे केले ... आणि उठलो. पहिले तर गेल्या आठ वर्षातले सगळे चढ उतार समोर परीक्षक म्हणून उभे होते ... अनेक वेळा डेनजर झोन मधून बायकोच्या साथीने मी शिताफीने बाहेर आलो ... कित्येक वेळा फ़क़्त तिच्याच मतांचा आधार होता. दिवसाची अशी अपेक्षित सुरुवात झाल्यावर कसे अगदी routine मध्ये असल्यासारखे वाटते ... हायसे वाटते ... बाजूला पहिले तर आमची द्वंद्व गीताची साथी (संसाराच्या गाण्याला किती चांगले रूपक आहे हे ... द्वंद्व गीत) आणि आमचा एकमेव हक्काचा प्रेक्षक दोघेही अजून झोपले होते .... मी पटकन विचार केला ... च्यायला एखादे फुल बिल आणून बायकोच्या उशीखाली ठेवावे ... पण तिने सवयीने उठल्यावर तिने जोर जोरात उशी झाडली ... तर उगाच चुराडा ... surprise चा पण आणि फुलांचा पण ... जाऊदे आपल्याला असे करावेसे वाटले ह्यातच सगळे आले ... आई शप्पत मी हे सगळे मनात बोललो होतो ... पण कसे काय माहिती नाही ... बायको झोपेतच हसली ... आणि पोराने नेहमीप्रमाणे तिचे "च" अनुकरण केले .... 

मी आपले दुधाची पिशवी घेतली, चहाचे आधण ठेवले ... खरच नेहमी पेक्षा आज वेगळे वाटत होते ... म्हणजे शरीर नेहमीच्याच कृती करत होते पण आज ते करतानाचे frustration नव्हते ... घाई नव्हती ... खरच ८ वर्षापूर्वी जन्मास घातलेले "नाते" आज मोठे झाले.... mature झाले ... श्या पुन्हा उगाचच जमीन हादराल्याचा भास झाला .... आणि निर्मिती तैंचा आवाज ऐकू आला ... "विनोद" मोठा झाला ..... आता बास झाले ... हे कार्यक्रम पहाणे बंद केले पाहिजे ... असे पुन्हा एकदा मी स्वताला बजावले .... चहा ओतू गेला .... एरवी गाढ झोपेत असणारी बायको नेमकी चहा आपल्या हातून ओतू गेल्यावर बरोब्बर मागे कशी काय उभी असते काय माहिती ... पण आज ती नव्हती ... (अरे वा आज नशीब पण साथ देत आहे ...) असुदे ... सगळे आवरून नेहमी प्रमाणे बायकोला office ला सोडले, पोराला शाळेत सोडले ... आणि स्वता टपरीवर चहाचे झुरके घ्यायला सुरुवात केली ...

लग्नाचा आठवा वाढदिवस ..... 
नक्की काय वाढते ह्या दिवशी ... एकमेकावरील प्रेम ? जिव्हाळा ? नात्याची दृढता ? वगैरे वगैरे .... हे फार पुस्तकी झाले ... मला विचाराल तर वाढतो एकमेकाबरोबर जगण्याचा अनुभव !  आणि कुठल्याही गोष्टीचा अजून १ वर्ष अनुभव वाढला कि आपोआप तुमचा आत्मविश्वास वाढतो Domain Expertise वाढतात ! अर्थात बायको हे Domain इतक्या झपाट्याने बदलत असते कि upto date राहण्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतात.  ह्याच्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो अगदी सारासारपणे अनेक दिवस विचारपूर्वक घडवून आणलेला बदल किवा वृद्धी  (अपेक्षान्मधली) ते अगदी एखाद्या मैत्रिणीने नुकताच उपभोगलेला तिचा लग्नाचा वाढ-दिवस.  असो आज हे बोलायचा दिवस नाही ... उद्यापासून आहेच ....

पण खरच "एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, वरचा "सा", वाः क्या बात  है !" ... भैया और १ कटिंग .... और आज क्रीम रोल भी दो ....

१३ टिप्पण्या:

When CK Speaks.... म्हणाले...

अप्रतीम!

Ravi म्हणाले...

Happy Anniversary!!!

Abhijeet Sawant म्हणाले...

apratim :)

पण खरच "एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, वरचा "सा", वाः क्या बात है !"

Rohit म्हणाले...

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा..... अप्रतिम आहे रचना..

Anagha म्हणाले...

अप्रतिम...असेच खूप खूप सुरेल सूर लागू देत ...ही सदिच्छा ! :)

Mahendra Kulkarni म्हणाले...

लग्नाच्या वाढदिवसा करता हार्दिक शुभेच्छा. ८ वर्ष!! हम्म्म्म्म.. दिवस कसे जातात ते समजतही नाही..!

Mahendra Kulkarni म्हणाले...

लग्नाच्या वाढदिवसा करता हार्दिक शुभेच्छा. ८ वर्ष!! हम्म्म्म्म.. दिवस कसे जातात ते समजतही नाही..!

Shrirang म्हणाले...

Very well written ! And yes happy anniversary :)
--Shrirang

Harish म्हणाले...

मग लग्नाष्टमीच्या फुगड्या घातल्या, घागरी फुंकल्या कि गोंधळ घातलात रे? हा हा हाहा...छान लिहिलेस. बायकोनी वाचले, वाचून दाखवलेस कि कसे? ;)

Prawin म्हणाले...

मस्त रे....
हार्दिक सुभेच्छा :)

Nil म्हणाले...

Sahi Bhidu.......mastach......na jane ka mi pan swatah la compare kela.....

Jaya म्हणाले...

hello vishwesh

kharach khoopach chan !!!!!!!

Lage Raho ......Jaya & Sandi's Family

(Pratyek Varshi He Nate Asech Vrudhingat hovo ashich isha charani Prarthana )

स्वामीजी म्हणाले...

टीव्हीवरील "पात्रां"ना आधी मारलेल्या कोपरखळ्या वाचल्यावर एकदा आपणही "कोणत्याही कलाकृतीची श्रेष्ठता तिच्या दर्जेदारपणात असते. ... जुनी गोष्ट आहे... १९४८ साली एका कार्यक्रमात..." अशी सुरुवात करत आपणही या कथेशी कसलाच संबंध नसलेलं एक लांबलचक व्याख्यान द्यावं, असा खोडसाळपणा मनात डोकावून गेला...!! ;)

पण नाही... इतक्या चांगल्या लागलेल्या सुरात उगाच रसभंग करायचा नाहीये...!

लग्नाच्या वाढदिवसासारख्या सामान्य (आता माझ्यासारखा संन्यासी वगळता प्रत्येकाच्या जीवनात हा "प्रसंग" येतोच ना..) घटनेचे भावनात्मक धागेदोरे कुठेही मेलोड्रामॅटिक न होता विणलेत...!!
मान गये !!