शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

अहो आण्णा ...


आण्णा, उपास करून करून एक होईल तुमची मान पाठ  
पिझ्झा खात उपोषण लाइव्ह बघाणार्यांशी तुमची गाठ ...

फेसबुक वर लाईक करून तुम्हाला पाठींबा देणारी हि जमात 
निवडणुकीच्या लॉंग वीकएंडला पळते सहकुटुंब रानावनात ... 

दोन दिवस मी देखील पुरवली माझी मोर्च्याची निषेधाची खाज 
५ ची टोपी २० ला विकत घेताना अजिबात बाळगली नाही लाज 

उधारीची मेणबत्ती घेऊन काल बर्याच दिवसांनी इतका चाललो 
शेवटी थकून २० रुपये ज्यादा देऊन रिक्षेने डायरेक्ट घरी आलो ...

अहो कुणाच्या भरवश्यावर आणि किती दिवस हे चालणार 
वेळ आली कि सगळेच जण नैतिकता चुलीत घालणार ...

शेवटी आम्ही पडलो सामान्य, आम्हात परिवर्तनाची काय कुवत 
आमच्या घरादारात, मनामनात शिरले आहे हे कडू कॉंग्रेस गवत

आण्णा, उपास करून करून एक होईल तुमची मान पाठ  
पिझ्झा खात उपोषण लाइव्ह बघाणार्यांशी तुमची गाठ ...

- विश्वेश 

३ टिप्पण्या:

ओहित म्हणे म्हणाले...

हा हा! सहमत तर नाही पण खरय!!

Sandeep Madyapgol म्हणाले...

मस्त आणि अगदी बरोबर :)

स्वामीजी म्हणाले...

बिच्चारे अण्णा...!
यांचा मीडियाच्या "सर्कशीतला वाघ" न होवो ही सदिच्छा...!