आज कितीक दिवसांनी ...
आज कितीक दिवसांनी ...
तुझा तो सवयीचा स्पर्श ...
अंग शहारून गेला ...
तुझा तो सवयीचा वास ...
मन सुगंधून गेला ...
आज कितीक दिवसांनी ...
तुझ्या नेहमीच्याच मोकळ्या केसात
पुन्हा हरवले हात ..
तुझ्या नेहमीच्याच लकबिंनी
पुन्हा हलवले खोल आत ...
आज कितीक दिवसांनी ...
माझ्या कवितेला सापडलीस तू
अन तुला सापडली माझी कविता
आज कितीक दिवसांनी ...
चाकोरीचा तोडून बांध
भरून वाहिली भावनांची सरिता ...
आज कितीक दिवसांनी ...
पुन्हा तू ... तीच तू ...
अन पुन्हा मी ... नवा मी ...
- विश्वेश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा