मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

श्री गणेशा - लिमिटेड माणुसकी

माणुसकी ... हे काय असते बुआ?

आज जेव्हा मला थोडी उसंत मिळाली तेव्हा उमगले कि चाकोरीबध्द आयुष्यामधून माणुसकीची गरजच संपत चाललेली आहे. स्वतःवरचा आंधळा आत्मविश्वास, देवावर अविश्वास असल्याचा गर्व, आधुनिक विचारसरणी (independent), तसल्याच आधुनिक कविता, कल्पना विश्वात नेवून भेसूर सत्य अधिक गडद रंगविणारे साहित्य, ह्या सगळ्यामुळे माणुसकीचा रंग फिक्कट पडत गेला ...

आणि मग मी रजनीकांत च्या रोबो चित्रपटाची कथा वाचली कुठल्याश्या ब्लोग वर, चित्रपट पाहण्याचे कष्ट आणि विषाची परीक्षा नको म्हणून. तुम्ही हसाल पण हीच माझी प्रेरणा आहे ह्या पहिल्या खरडीची.

मी आणि माझा रोबो :

आजची पिढी पहिली कि मला जाणवते खरच आज आपण अचाट शक्ती असलेले, असाध्य ते सध्या करणारे रोबो बनलो आहोत आणि बनवतो आहोत. (मी बनवतो हा शब्द मुद्दाम वापरला कारण अजूनही मला संभ्रम आहे कि आपण घडवितो कि बनवितो ?)
च्यायला पोरगा जन्माला आला कि वजन किती ... मग कोणाचे किती असते? ideal किती असले पाहिजे? मग कमी असेल तर काय? जास्त असेल तर काय ? पालथा कधी पडणार? रांगणार कधी? उभा कधी रहाणार? चालाणार कधी? बोलणार कधी? दात कधी येणार? आला बरका वर्षाचा वाढदिवस grand झाला पाहिजे, return gift काय आहे ? मग आतापासून त्याला social करा, घरी आई, आजी, आजोबा असले तरी पाळणाघरात ठेवा, हेच वय आहे शिस्त लावायचे, अहो स्वताच्या हाताने खाल्ले पाहिजे आता, potty training झाले नाही वाटत अजून ? playgroup मध्ये घाला आता, (शाळेतून updates) फार रडतो, डबा स्वताच्या हाताने खात नाही, sharing ची सवय नाही, चप्पल स्वताची स्वतः घालत नाही ...

मला प्रश्न पडतो आपण माणसाचे पोर वाढवत आहे कि रोबो तयार करत आहे ? जो पुढे जाऊन असेच चाकोरीबध्द independent आयुष्य जगेल, जगू शकेल ? (barely be able to survive)

असे असेल तर मला खरच माझ्या पोरामध्ये बाहेरून माणुसकी पेरता येईल का? (installation, plugin etc?)
अगदी चित्रपटात दाखवली आहे तेवढी नाही ... पण लिमिटेड ? लिमिटेड माणुसकी ?

३ टिप्पण्या:

Harish म्हणाले...

छान! सुरेख सुरुवात आहे. गम्मत तीच आहे कि हि अशी उसंत मिळाली कीच आपण अंतर्मुख होतो म्हणूनच कि काय पूर्वापार सांगून गेलेत, आपल्यासाठी थोडा वेळ द्या! तो "आपल्यासाठीचा" वेळ म्हणजे नक्की काय हे बरेच चित्रपट, निरर्थक गप्पा, अफाट आणि अचाट वाचन, झालेच तर चर्चा वगेरे करून झाले कि आठवते किंवा वाटते कि अरेच्या, हे असे काही करण्यासाठी म्हणून आपण वेळ काढला नव्हता !

शिवाय, दुसऱ्याला सांगणे सोपे, पण तेच आपण आचरणात आणणे कठीण वाटते. कारण स्वतःवरचा विश्वास. त्याचाच अभाव आहे, म्हणून माणुसकी तुटत/ संपत चाललीये. कळप च्या कळप नुसते वाट पायदळी तुडवतायेत, पण ह्या वाट सुद्धा नवीन नाहीत, त्याच-त्या वाटा, पुढचे गेले, बहुतेक पोचले, चला आपण पण त्याच वाटेवर निघू! अहो हो...पण नवीन वाट एकादी चोखाळली तर बिघडेल? आणि मग हेच आपल्या आयुष्याची इति-कर्तव्यता समजून, आपल्या पोर बाळांना असेच "घडवतो"; किंबहुना पोरे पण अशीच निपजतात.

रामदास स्वामी बोहल्यावरून पाळले इतकेच लक्षात राहते! "सावधान" कोणी लक्षात ठेवायचे? "अखंड सावधानता"!!!

हल्लीच्या शाळा आणि त्यातले मास्तर/मास्तरनी ह्यांची पैदास हे अशीच, एकादाच निराला, वेगळा ठरतो. अहो ज्याला आयुष्य उमगले तो कसचा इथे थांबतो? :) किंवा तो उगाच ह्या जगाच्या पालथ्या घड्यावर पाणी ओतायला जात नाही. तो बापडा जमेल तितके स्वतःच उरकत घेतो...शेवटी निदिध्यास महत्वाचा! विचारांना अशी चालना मिळाली कि कळते कि आपल्या मेंदू मध्ये काही केंद्र अशीहि आहेत कि कधी अद्याप चाचपलीच गेली नाहीयेत. पुन्हा हेच ते रामदासांचे...."शहाणे करुनी सोडावे सकाळ जन"...असावे कदाचित कोणास ठाऊक.

आयुष्याचे त्रैराशिक मांडतांना काही महत्वाचे हच्चे विसरून चालत नाहीत. हे काही हच्चे आपण स्वतः भरडलो कि मिळतात, पण बहुतांशी आपल्या वाड-वडिलांकडून "इस्टेट" म्हणून फुकट मिळतात. पण...we are so used to reinventing the same wheel over and over, again and again! We don't help ourselves...and can't get rid of it so easily.

Harish म्हणाले...

भलत्याच कल्पनांची अनोखी कृष्ण माया,
शब्दावाचून ज्ञान, आत्म्यावाचून काया!!!

ओहित म्हणे म्हणाले...

hmm ... sad but true ...!