पाहिलं तर जुने कोपरे, कोनाडे स्वताशीच काहीतरी कुजबुजत होते ...
कान देऊन ऐकल ... देत होते मला शिव्या काढत होते खोट ...
गेली बरीच वर्ष त्यांना विसरून नुसतेच भरतोय खिसे, नुसतेच भरतोय पोट ...
मला म्हणाले ... आठवतंय का तुझ रुसून कोपर्यात बसण ...
आणि आई ने कान धरले कि गालात खुदकन हसण ...
आता फार मोठा झालास ... घरातही वावरतोस साहेब म्हणून ...
रुसलास कि काय बुआ... आता जातोस घर बीर सोडून ...
अजूनही मागे वळून बघ आईने धरले आहेत कान
तू जरी नाही आलास तरी रोज वाढते तुझे जेवायचे पान
तुझे जेऊन झाल्यावर त्याच उष्ट्या ताटात जेवायची तुझी माय
आता कधी विचारतोस का तिला ... तुझे जेवण झाले काय ?
आमचे इतकेच म्हणणे आहे आमच्याशी दोन शब्द बोल
जवळ येऊन बघ कधी ... भेगा पडल्यात किती खोल
वाटले खूप बोलावे ... करावे मोकळे मन ... पण नुसतेच थरथरले ओठ
खरच ... गेली बरीच वर्ष त्यांना विसरून नुसतेच भरतोय खिसे, नुसतेच भरतोय पोट ...
४ टिप्पण्या:
अप्रतिम ..
आवडली कविता
अप्रतिम लिहिलंय... खरंच खूप सुंदर..
Besht
काही कविता मनात घर करून राहतात आणि मनाला मागे कुठेतरी भूतकाळात नेऊन ठेवतात.. अशीच आहे ही कविता. लिहित रहा.
टिप्पणी पोस्ट करा