बुधवार, २९ डिसेंबर, २०१०

कडेलोट !

आज वाटले इतक्या लवकर रात सरली ... आभाळ निळावले 
पण कुशीतून तुझ्या मोकळे होण्यास मन आळसावले ...

सांगत होते अगतिक मन अजून फिटली नाही हौस 
झेलूदे चार हाताच्या ओंजळीत हा दवाचा पाउस  

झटकून मोकळे केस उठून लगबगीने कुठे जासी ?
झालो आहे ह्या मोहरानात मी वनवासी ...

शोधात होत्या अनंत काळ तुला माझ्या चुरगळलेल्या नजरा ..
हातात उरला होता तुझ्या सुगंधाने घमघमणारा गजरा ...

समजावले मनाला .. चला भरायचे आहे पोट ...
पुन्हा एकदा ........ मी माझाच केला कडेलोट ...

५ टिप्पण्या:

Abhijeet Sawant म्हणाले...

छान झाली आहे कविता ..

मी माझाच केला कडेलोट,
झेलूदे चार हाताच्या ओंजळीत हा दवाचा पाउस

आवडले

Shirish Jambhorkar म्हणाले...

Khupach arthpurn

राजेंद्र अहिरे म्हणाले...

Liked.......

Beyond Foobar म्हणाले...

अप्रतीम मस्तच

Unknown म्हणाले...

:) Antarmukh karun jatat hya asha lines !