रविवार, ६ मार्च, २०११

मी घर बदललंय


दर आठवड्याला ठरल्याप्रमाणे देवळात गेलो .... अन ह्या २ ओळी सुचल्या .....

देवभोळा नसण्याची permission मी देवाकडूनच घेतली आहे ...
अन आमच एकमेकाला status reporting weekly आहे ...

पुढे त्याचा विस्तार एका वेगळ्याच कवितेत झाला ....


कुठे गेली माझ्या घरावरची तुझी सावली...  
कुठे गेला तो मेघ, कुठे गेली ती कृपावृष्टी ... आता सगळच सरलंय ..
मला काळात नाही देवा ... कि तू जागा बदललीस कि मी घर बदललंय

महागाई नुसार वाढवलाय मी तुझ्या दक्षिणेचा भत्ता ...
अन त्याच पेटीत टाकला आहे मी माझा नवीन पत्ता 
बघ जमले तर काढ मज पामरासाठी थोडा वेळ 
अन संपवून टाक एकदाचा हा उन सावलीचा खेळ 

लढताना रोजची लुटुपुटूची लढाई नाही आली कधी कपाळावर आठी 
अरे कारण विश्वास होता माझा कि कितीही झाले तरी तू आहेस पाठी 
तुला असे वाटले का कि ह्याला आता आपली गरज नाय ....
चेहऱ्यावरचे हसू पाहून .... घेतलास कि तू काढता पाय

आता सवय होऊ लागली आहे तुझ्याशिवाय जगायची ...
आता सवय होऊ लागली आहे तुझ्याशिवाय लढायची ...
तरीही नित्य नेमाने घालतो प्रदक्षिणा ... तुझ्या गाभार्याभोवती 
तुझ्याशिवाय माझा मी लढतो आहे ...     ह्याची खरतर हि पावती ...

ज्या दिवशी माझा नित्यक्रम चुकेल त्या दिवशी ... तू ये घरी 
तेव्हा तुझी खरी गरज असेल....  सध्या सगळ बर चाललंय 
मला काळात नाही देवा ... कि तू जागा बदललीस कि मी घर बदललंय

२ टिप्पण्या:

Ravi म्हणाले...

ना मी बदललीय जागा ना तू बदलयास घर
प्रश्न आहे श्रद्धेचा खर सांगायचं तर
शांतपणे विचार केलास तर कळेल क्षणामध्ये
माझी जागा तिथेच आहे तुझ्या मनामध्ये
जितका जाशील स्वतःपासूनच दूर ..
जाशील माझ्यापासुनही दूर ..
जितका राहशील प्रामाणिक स्वतःशी
तितकाच जोडला जाशील माझ्याशी ..

Unknown म्हणाले...

apratim aahe hi !!!