आठवत नाही ध्येया मी कधीचे तुझ्या मागे धावतो आहे
तू पुढे कि मी माहित नाही पण सवय म्हणून जगतो आहे
न तुला थकायची सवय राहिली न मला थकायची सवड
एकमेकांभोवती फिरता फिरता होते दोघांचीही परवड
जगण्याची हि युद्ध नीती मी शिकलो आईच्या पोटात
उमगले नाही मलाच कधी शिरलो ऐहिकाच्या गोटात
मन मारून केलेल्या सौद्यांना अन वचनांना जागतो आहे
आज उमगले खरं तर,
जगण्याच्या त्रेराशिकात मी सुखाला उपभोगाने भागतो आहे
२ टिप्पण्या:
sundar!
जगण्याच्या त्रेराशिकात मी सुखाला उपभोगाने भागतो आहे..
far bhari!
टिप्पणी पोस्ट करा